Search This Blog

My Blog List

Saturday, July 31, 2010

तू म्हणजे एक स्वप्न... !

तू म्हणजे एक स्वप्न... !
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे......

तू म्हणजे एक स्वप्न... !

मनात दडून ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातून ओघळणारे......

तू म्हणजे एक स्वप्न... !
श्वासाश्वासात भिनलेले,
तरीही, दूर दूर असणारे......

Monday, October 6, 2008

समजावुनी व्यथेला ........



समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !

सर एक श्रावणाची आली ... निघून गेली ...
माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले ?

सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा;
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले !

चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !

लपवीत गीत माझे पळ काढला तरीही
हृदयांतल्या विजांना झिडकारता न आले !

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखेर माझे मज टाळता न आले !

Thursday, September 25, 2008

अशाच एका संध्याकाळी



अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना
असे घडावे अवचीत काही तुझ्या समीप मी असताना

अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चिट्टपाखरु केवळ तुझी नि माझी जवळीक

संकोचाचे रेशीम पदडे हा हा म्हणता विरुन जावे
समय सरावा मंद गतीने अन् प्रितीचे सुर जुळावे

मी मागावे तुझीयापाशी असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तु हवे हवेसे असताना

शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी या लपलेले
मुक्तपणे तु उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले


Thursday, September 18, 2008

Kadhi Sanzveli



.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Kadhi Sanzveli, Mala Aathvuni
Tujhya Bhovtali, Jarashi Valuni
Pahshil ka ?

Tujha dur yethe, uthu de shahara
Shariravaruni, jasa gaar vaara
Vahshil ka ?

Rite sur aata, ithe ya urashi
Jara sobtila, manachya talashi
Rahshil Ka ?

Tujhya athvanna, ithe sahto mi
Tula sahto mi, tashi tu malahi
Sahshil Ka ?